Posts

Showing posts from August, 2020

Napoleon Bonaparte The Emperor of France..!!!

Image
                              नेपोलियन बोनापार्ट.... नेपोलियन I..... फ्रान्स चा लष्करी नेता आणि बादशहा. १९ व्या शतकातील अर्ध्या यूरोपचा स्वामी. या महाकाव्याचा जीवनप्रवास अत्यंत नेत्रदीपक आहे. जगविख्यात योद्धा, कुशल रणनितीतज्ञ, लोकोपयोगी कायदे करणारा बादशहा. याने देशाच्या सैन्य , कायदेविषयक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये क्रांती केली.            नेपोलियनचा जन्म १५ ऑगस्ट १७६९ रोजी, कॉर्सिका बेटातील अजाशिओ या गावी झाला. त्याच्या वडिलांचे नाव चार्लस् बोनापार्ट आणि आईचे लिटेशीया होते. नेपोलियनच्या जन्मापूर्वी कॉर्सिकाचे फ्रेंचांशी स्वातंत्र्ययुद्ध चालू होते. ही झुंज साठ वर्षे चालून अखेरीस फ्रेंचांचा त्यात जय झाला. नेपोलियनचे वडील वकिलीचा व्यवसाय करीत. वयाच्या ९ वर्षांपासून नेपोलियनचे शिक्षण बीन्नीच्या शाळेत झाले. १७८५ ला फ्रेंच मिलिटरी अकॅडमी मधून पदवी पूर्ण केल्या नंतर १७८९-१७९९ या फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात नेपोलियन सैन्यात भरती झाला. सुरुवातीला तो फ्रेंच सैन्याच्या तोफखाना रेजिमेंट मध्ये सेकंड लेफ्टनंट होता आणि १७९३-९४ च्या काळात नेपोलियनला सैन्यात ब्रिगेडिअर म्हणून पदोन्नती मिळाली.